गेलच्या धडाकेबाज खेळीने पंजाबचा सनरायझर्स हैदराबाद मात

0

मोहाली :- ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी विंडीजच्या ३८ वर्षीय ख्रिस गेलने ६३ चेंडूत ११ षटकार आणि १ चौकार मारत १०४ धावांची स्फोटक खेळी केली.
यंदाच्या लिलामध्ये दुर्लक्षित झालेल्या या खेळाडूने पंजाब टीमकडून मोहालीच्या मैदानावर वादळी खेळी केली. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना या वादळी शतकाच्या बळावर हैदराबादसमोर विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. विजयासाठी पाठलाग करताना हैदराबादला निर्धारीत २० षटकात फक्त १७८ धावाच करता आल्या.किंग्ज इलेव्हन पंजाबने गुरुवारी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघावर १५ धावांनी मात केली.

गेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तुफानी फटकेबाजी करत यंदाच्या सत्रातील त्याचे हे पहिले शतक ठरले. अवघ्या ५८ चेंडूंमध्ये ११ षटकार आणि १ चौकार सहाय्याने शतक लगावले. गेल आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असला तरी ठरवल्यावर आपण काहीही करू शकतो, हे गेलने गुरुवारी दाखवून दिले. त्याने हैदराबादच्या गोलंदाजांचा अक्षरक्ष पालापाचोळा केला. राशिद खानच्या ४ षटकात तब्बल ५५ धावा लुटल्या. हैदराबादची गोलंदाजी मजबूत समजली पण गेलच्या धडाकेबाज फलंदाजीने त्यांचा टिकाव लागला नाही.