मुंबई : बॉलीवूडची बार्बी डॉल कतरीना कैफ ही ‘हुसेन परछम’ या गाण्यामुळे जास्तच चर्चेत आहे. सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत कतरिनाचे नांव आहे. मात्र तरीही गेल्या दहा वर्षांत कोणीही मला डेटसाठी विचारलं नाही, असा खुद्द कतरीनाने बोलून दाखवलं.
आश्चर्य म्हणजे कतरिना वर्षभरापूर्वी रणबीर कपूरला डेट करत होती. ‘अजब प्रेम की गजब’ कहाणीपासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमप्रकरणाला मागच्या वर्षी पूर्णविराम लागला. दुर्दैव म्हणजे त्यानंतर काही महिन्यातच रणबीर कतरिनाची जीवलग मैत्रीण आलियाला डेट करू लागला. या नात्यामुळे कतरिना आलियाच्या मैत्रीत कायमचा दुरावा आला असंही म्हटलं गेलं. त्याआधी कतरिनाचं नाव सलमानसोबतही जोडलं गेलं होतं. सलमान कतरिनाशी लग्न करणार अशाही चर्चा होत्या.