गैरव्यवहार : मुख्य आरोपीसह दोघे जाळ्यात
रावेर पंचायत समितीतील दिड कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी रावेर पोलिसांची धडक कारवाई : आरोपींच्या गोटात अस्वस्था
रावेर : राज्यभर गाजत असलेल्या रावेर पंचायत समितीतील शौचालय योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोन आरोपींच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले आहे. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 12 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. समूह समन्वयक समाधान निंभोरे हे शुक्रवारी सकाळी रावेर पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली तर सातत्याने अनुदानाची रक्कम खात्यावर आल्याने अजंदा येथील विलास सावकारे यास अटक करण्यात आली. अपहार प्रकरणातील आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे तर आणखी अनेक आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत. शुक्रवारी रात्री पुन्हा अटकसत्र राबवले जाणार असल्याची चर्चा आहे.
दिड कोटींच्या अपहार प्रकरणी कारवाई
रावेर पंचायत समिती वैयक्तीक शौचालय योजनेत दिड कोटींचा भ्रष्ट्राचार झाला होता. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे तर शुक्रवारीपुन्हा रावेर पोलिसांनी अटकसत्र राबवत अजंदे येथून विलास सावकारे याला अटक केली तर शुक्रवारी मुख्य आरोपी व समूह समन्वयक समाधान निंभोरे हा पोलिसांपुढे हजर होताच त्यास अटक करण्यात आली. शौचालय योजनेच्या इतक्या मोठ्या रकमेची व्हिल्हेवााट निंभोरे यांनी कशी लावली ? रावेर पंचायत समितीतील आणखी कोण-कोणत्या अधिकारी व पदाधिकार्यांनी या भ्रष्टाचारात आपले हात काळे केले ? हे लवकरच पोलिस तपासातून पुढे येणार आहे.