पुणे । जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग प्रमुखांच्या गैरहजेरीत त्यांच्या केबीनमध्ये कर्मचार्यांनी वाढदिवस साजरा केल्याचा प्रताप जिल्हा परिषदेत घडला. त्यामुळे अधिकार्यांच्या गैरहजेरीत कर्मचार्यांनी घातलेल्या गोंधळामुळे जिल्हा कृषी विभागातील कर्मचार्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास समाजकल्याण विभागात एका कर्मचार्याने वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. यावेळी या विभागातील कर्मचार्यांनी धांगडधिंगा घातल्यामुळे कृषी विभागात काम करणार्या कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागला.
जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागातील कर्मचारी दुपारी जेवण झाल्यानंतर इमारतीभोवती फिरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जेवणाच्या सुटीपेक्षा अधिक वेळ जिल्हा परिषदेच्या इमारतीला फेर्या घालण्यात कर्मचारी व्यस्त असतात. दरम्यान कामानिमित्त आलेल्या अनेक नागरिकांना कर्मचारी वेळेत जागेवर उपलब्ध होत नसल्याने ताटकळत सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबधित कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.