गोंधळी नेमाडी समाजाचा सामुहिक विवाह सोहळ्यात 9 जोडपी विवाहबद्ध

0

जळगाव । वासुदेव जोशी गोंधळी नेमाडी समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात समाजातील नऊ जोडपी विवाहबद्ध झाले. वासुदेव जोशी गोंधळी नेमाडी समाज सेवा संघ व वासुदेव जोशी समाज बहुद्देशीय युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हेमू कलाणी बगीच्या जवळ विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या उदघाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

या जोडप्यांचे झाले शुभमंगल
या सोहळ्यात समाजातील सोनू दिलीप श्रीखंडे व रुपाली कैलास कानडे, सुभाष रघुनाथ दोरकर व मेघा संतोष वावरे, विजय मणिलाल वाघ व सपना भागवत भोजणे, शंकर पंडीत अहिरे व प्रियंका शैलेष वावरे, प्रमोद खेमचंद झोटूंगे व योगिता दिनेश कासारगण, प्रसाद गंगाधर शिंदे व वेणुका दयाराम गंगावणे, पंकज नरेश मोरकर व नम्रता रामराव विधाते, विशाल रविंद्र भाटे व उर्मिला मधुकर भोपे, जयेश मनोहर मोरकर व जया अनिल गोंडे हे नऊ जोडपे विवाहबद्ध झाली.

सामाजिक विषयांची जनजागृती
विवाह सोहळ्यात पाणीवाचवा, स्वच्छ भारत अभियान, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ या ज्वलंत विषयाबाबत जनजागृती करण्यात आली. वासुदेव जोशी समाजाच्या सामुहिक विवाहसोहळ्यात मालेगाव, बारडोली, धुळे, कुर्ला, दिल्ली, नंदुरबार, अजमेर, मुंबई यासह इतर राज्यभरातून समाजबांधव उपस्थित होते.

विविध मान्यवरांची उपस्थिती
प्रमुख पाहुणे ना. गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, खा.ए.टी. पाटील, आ.एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन, अशोक जैन, आ. राजूमामा भोळे, आ. चंदुलाल पटेल, आ. चंद्रकांत सोनवणे, महापौर ललित कोल्हे, सुनिल महाजन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील, रमेश श्रीखंडे, प्रकाश बालाणी, भगत बालाणी, डीवायएसपी सचिन सांगळे, सुनिल भंगाळे, पो.नि. अनिरुद्ध आढाव, गोपाल दर्जी, डॉ.ए.जी. भंगाळे, रविंद्र सोनवणे, श्रीराम खटोड, डॉ. प्रताप जाधव, अ‍ॅड. सुशिल अत्रे, अ‍ॅड. निरंजन चौधरी, अ‍ॅड. पंकज अत्रे, विशाल विधाते उपस्थित होते.