गोजोरा येथे चिमुकल्यांनी केली कलागुणांची उधळण

0

भुसावळ । तालुक्यातील गोजोरा येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र कोळी हे होते. साकेगाव वेद्राचे वेंद्रप्रमुख संजय श्रीखंडे, रविंद्र कोळी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष गणेश पेैगडे यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्याथ्र्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन वेैंद्रप्रमुख श्रीखंडे यांनी केले. किलबिल, चला जेजुरीला जाऊ, कोलीवाड्याची शान इत्यादी गाण्यांवर विद्याथ्र्यांनी बहारदार नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच शिवाजी पाटील, ग्रामसेवक बादशाह, संगिता कोळी, सुनिता सोनवणे, भागवत कोळी, अनिल वारके, उल्हास ढाके, हर्षल तळेले, प्रदिप निळे, बाळु भटकर, नंदू धनपाल, धनराज वाघ, ज्ञानेश्वर कोळी, वैैलास पाटील, ज्ञनेश्वर सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापिका डोळे यांनी प्रास्ताविक केले. तर वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार लिना अहिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गटशिक्षणाधिकारी विजय पवार व शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली लता गालफाडे, प्रिती चौधरी, क्रांती तळेले, राजेश चिमणकर यांनी परिश्रम घेतले.