तज्ज्ञांनी घेतले ठसे ; गावाच्या इतिहासत प्रथमच झाली चोरी ; एकाच रात्री तीन दुकाने फोडल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
भुसावळ– तालुक्यातील गोजोरा गावातील ग्रामपंचायतीच्या तीन गाळ्यांना चोरट्यांनी टार्गेट करीत सुमारे सव्वा तीन लाखांची रोकड लांबवल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी चोरीच्या घटना उघडकीस आल्या. गोजोरे रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यापारी संकुल आहे. चोरट्यांनी एकाच संकुलातील तीन गाळ्यांचे कुलूप तोडत रोकड लांबवली. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत
पंचनामा केला.
तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
तालुक्यातील गोजोरे येथे आतापर्यंत चोरी झाल्याचे ग्रामस्थांना माहिती नाही मात्र गुरुवारच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. वराडसीमकडे जाणार्या रस्त्यावर ग्रामपंचायत मालकीचे व्यापारी संकुल आहेत. संकुलातील साई बाबा हार्ड वेअरमधून 10 हजार तर अंबिका कृषी केंद्रातील 13 हजारांची रोकड लंपास केल्यानंतर चोरट्यांनी साईबाबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादितचे शटर तोडून तिजोरीतील दोन लाख 89 हजार 429 रुपयांची रोकड लांबवली. या प्रकरणी पतसंस्थेचे व्यवथसपक युवराज शंकर अस्वार (47, भिरूड कॉलनी, भुसावळ) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी एकूण तीन लाख 12 हजार 429 रुपयांची रोकड लांबवली. तपास उपनिरीक्षक सचिन खामगड करीत आहेत.