वाघोली : बंद गोडावूनचा पत्रा फोडून 3200 कपबशीचे सेट व 450 फॅन्सी लाईटसचे पिस असा एकुण 16 लाख 40 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना प्रियंकानगरी येथील गुप्ता वेअर हौसिंग घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोडावूनचे मॅनेजर निखील किशोर सिंघवी (रा. कोंढवा बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, प्रियंका नगरी येथील गोडावून परिसरामध्ये महावीर गजराज नागोरी यांच्या मालकीचे गोडावून आहे. याठिकाणी अनेक फरशांसह कपबशी व फॅन्सी लाईटस ठेवल्या होत्या. दि. 19 फेब्रुवारीला गोडावून बंद केल्यानंतर सोमवार दि. 26 रोजी गोडावून उघडल्यानंतर गोडावूनचा पत्रा फोडून 12 लाख 80 हजारांचे 3200 कपबशीचे सेट व तीन लाख 60 हजारांच्या 450 फॅन्सी लाईट चोरटयांनी लंपास केल्याचे समजले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उत्तमराव सस्ते करीत आहेत.
सुरक्षारक्षकांची नेमणुक करा :
साडे सोळा लाखांची चोरी केलेल्या गोडावून मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, वीज पुरवठयाची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. त्यामुळे पोलिसांना तपासामध्ये अडचणी येत आहेत. गोडावून परिसरामध्ये मालकांनी सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांची नेमणुक करावी असे आवाहन लोणीकंद पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.