Thieves march towards alcohol: Liquor worth seven and a half lakhs was stolen during the raid धरणगाव : चोर्या-घरफोड्या करणार्या चोरट्यांनी आता दारूकडे आपला मोर्चा वळवत पाळधी येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एस.पी.वाईन शॉपचे गोडावून फोडून तब्बल 7 लाख 49 हजार रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू लांबवल्याने खळबळ उडाली. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी उघडकीस आली चोरी
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एस.पी.वाईन शॉप दुकानाच्या मागे असलेल्या लहान गोडावूनचे वरच्या पत्र्याला असलेले व्हॅन्टीलेशन फॅन उचकावून चोरट्यांनी देशी-विदेशी दारूच्या सीलबंद असलेले बॉक्स मिळून सात लाख 49 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार शनिवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीला आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, एस.पी.वाईन शॉपचे व्यवस्थापक भुषण जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.