गोदावरी इंग्लिश स्कुलमध्ये विद्यार्थी अधिकार पदवी प्रदान समारंभ उत्साहात

0

जळगाव । येथील गोदावरी इंग्लिश स्कुलमध्ये गुरूपोर्णिमा सप्ताहनिमीत्त आयोजीत विद्यार्थी अधिकार पदवी प्रदान समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. गोदावरी सीबीएसई इंग्लिश स्कुलतर्फे गुरूपोर्णिमा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

सप्ताहांतर्गत वनमहोत्सव, गुरूपोर्णिमा, कार्यक्रम घेण्यात आले. आज विद्यार्थी अधिकार पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे कर्नल दिलीप पांडे आणि कर्नल एलेक्स जोसेफ यांच्यासह अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, श्रीमती गोदावरी पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, प्राचार्या निलीमा चौधरी आदी उपस्थित होते. आदीत्य जैन, सारस किनगे, ध्रृव महाजन, अश्विनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावीतील विद्यार्थी स्वप्नाली पाटील, मोहीत सैनी, आदीत्य वारके, प्रांजल धानी, डिगेश काळे, गायत्री बर्‍हाटे, अमन सैनी, रूतुजा भोळे, हिमांशु बेंडाळे यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थी अधिकारी म्हणून भावेश पाटील, अक्षदा पाटील, आदीत्य पाटील, पियुष वसिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली.