गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात लक्ष्मी मुंजेवार ठरली गोविंदा

0

जळगाव : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात बीएससी अंतीम वर्षातर्फे आयोजीत दहीहंडी महोत्सवात जीएनएम तृतीय वर्षाची विद्यार्थीनी लक्ष्मी मुंजेवार हीने पहील्याच प्रयत्नात दहीहंडी फोडून गोविंदा ठरली. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील बीएससी अंतीम वर्षातर्फे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणुन महाविद्यालयाचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, प्राचार्य रविंद्र पुराणिक, राधा नायर, प्रा. प्रविण कोल्हे उपस्थित होते. दहीहंडी महोत्सवात डीजेच्या तालावर विद्यार्थ्यांनी प्रचंड जल्लोष केला. मच गया शोर सारी नगरी रे, गो गो गो गोविंदा, गोविंदा आला रे आला या गाण्यांची विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता.

दहीहंडी महोत्सवात आचल काळे ही राधा तर स्वप्नील शेळके ह्या विद्यार्थ्याने कृष्णाची वेशभूषा साकारली होती. त्यानंतर दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थीनींनी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पहील्याच प्रयत्नात जीएनएम तृतीय वर्षाची लक्ष्मी मुंजेवार या विद्यार्थीनीने दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. सुत्रसंचालन शबनम शेख व सतीश गाडीलोहार यांनी केले. तर आभार मयुरी शिरसाठ हिने मानले.