गोपी थोनाकल पहिला विजेता

0

डोंगुआन (चीन) । गोपी थोनाकल आशियाई मॅरेथॉन स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. गोपीने अवघ्या तिन सेंकदाच्या फरकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकत हे ऐतिहासीक यश मिळवले. गोपीने दोन तास 15 मिनीटे 48 सेकंदात ही शर्यत पूर्ण करत उझबेकिस्तानच्या आंद्रे पेत्रोव्हला मागे टाकले. दुसर्‍या स्थान मिळवणार्‍या आंद्रेने ही शर्यत पुर्ण करण्यासाठी दोन तास 15 मिनीटे 51 सेकंद एवढा वेळ घेतला.

मंगोलीयाच्या ब्यमबालेव्ह सीवेनरावदानने दोन तास 16 मिनीटे आणि 14 सेंकद अशी वेळ नोंदवत आपले कांस्यपदक निश्‍चित केले. आशियाई मॅरेथॉन स्पर्धेचे वेगळे आयोजन व्हायला सुरुवात झाल्यापासून ही स्पर्धा जिंकणारा गोपी भारताचा पहीलाच धावपटू आहे. याआधी कोणात्याही पुरुष धावपटूला ही कामगिरी साधता आली नव्हती.यापुर्वी आशियाई ट्रॅक अँड फिल्ड अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान मॅरेथॉनचे आयोजन केले जायचे. त्यावेळी भारताची आशा अगरवाल ही स्पर्धा जिंकली होती.