गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाचा मृत्यू

भुसावळ : अनोळखी प्रवाशाचा रेल्वे प्रवासात आजारपणामुळे मृत्यू झाला. डाऊन 20103 एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मृत प्रवाशाला भुसावळ जंक्शनवरवर उतरवून घेण्यात आले.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
मंगळवारी दुपारी भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म सातवर एलटीटी गोरखपूर ही एक्स्प्रेस गाडी आल्यानंतर बोगी क्रमांक डी-2 या डब्यातील सात नंबरच्या सीटवर बसून प्रवास करीत असलेला एक अनोळखी प्रवासी अत्यवस्थ झाल्यानंतर प्रवाशांनी टीसीच्या माध्यमातून वैद्यकीय विभागाला सूचना केल्या होत्या. गाडी जंक्शनवर आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्या प्रवाशाची तपासणी केली असता तो प्रवासी मृत असल्याचे जाहीर केले त्यामुळे त्या प्रवाशाचा मृतदेह गाडीतून खाली उतरविण्यात आला. हा मृतदेह जळगाव येथे विच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. याप्रकरणी उपस्टेशन मास्तर अशोक तायडे यांनी दिलेल्या माहितीवरून जीआरपी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याप्रकरणी प्रवाशाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. तपास पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दुर्योधन तायडे करीत आहे.