गोरगरीब रूग्णांसाठी शिबिरे आवश्यक -नंदकुमार महाजन

0

रावेरात मोतीबिंदू शिबिरात झाली 140 रूग्णांची तपासणी

रावेर- समाजात मोतीबिंदू रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असून गरीबीमुळे मोठ्या रुग्णालयात शस्रक्रिया करणे शक्य नसते. यामुळे गोरगरीब रुग्णांसाठी अशा शिबिराची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले.
रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पुणे अंधजन मंडळ, भंवरलाल आणि कांताबाई जैन फौऊंडेशन, जळगाव व रावेर येथील भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर मंगळवारी झाले. या शिबिरात 140 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 13 जणांना जळगाव येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.

यांची होती उपस्थिती
भाजपा तालुकाध्यक्ष सुलील पाटील, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कांताई नेत्रालयाचे युवराज देसर्डा व सुत्रसंचलन विजय चौधरी यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, योगीता वानखेडे, नगरसेवक अ‍ॅड.सुरज चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीकांत महाजन, माजी उपसभापती महेश पाटील, प्रल्हाद पाटील, रवींद्र महाजन, पत्रकार देवलाल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यांनी केली तपासणी
या शिबिरात चिकित्सक किरण जाधव यांनी तपासणी केली. त्यांना युवराज देसर्डा यांनी सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील व परीसरातील गरजु रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. यशस्वीतेसाठी सुनील पाटील मित्र परिवार व खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन, व सहकार्‍यांनी परीश्रम घेतले.