रांची । भारतीय संघाच्या हातात असलेला कसोटी सामना भारताच्या गोलंदाजांना जिकता आला नाही. 152 धावांची आघाडी घेतल्यावर कर्णधार विराट कोहलीने चौथ्या दिवसाच्या अखेरीस कांगारू संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.तो काही प्रमाणात फिरकी पटू जडेजाने याने सार्थक करून दाखविला.ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 23 अशी होती.शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाज आपल्या गोलंदाजीची कमाल दाखविणार आणि ऑस्ट्रेलियाला 800 वा सामन्यात पराभवाचे तोड पहावे लागणार असे चिन्हे दिसत होती.पाचव्या दिवशी उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज तंबूत दाखल झाले होते आणि संघाने शंभरचा आकडा देखील गाठला नव्हता. उरलेल्या दोन सेशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव गुडाळण्याचे आव्हान भारतीय गोलंदाज पेलू शकले नाही.ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हॅण्ड्सकोम्ब आणि शॉन मार्श यांनी महत्त्वाच्या क्षणी मैदानात टीच्चून फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला तारले.शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 विकेट गमावून 204 धावा बनवल्या. मॅथ्यू वेड (9) आणि पिटर हँड्सकॉब (68) नाबाद राहिले.हा सामना अनिर्णीत राखण्यात ऑस्ट्रेलियांच्या फलंदाजांना यश आले.यामुळे भारताला या कसोटीत आघाडी घेण्याची संधी गमवावी लागली.तर ऑस्ट्रेलियांने 800 वा सामना अनिर्णीत राखून पराभवापासून आपला बचाव तर केला मात्र त्यांच्यासाठी महत्वाची असलेली कसोटी विनानिर्णय खंत्म केली.याचा आनंद त्यचाया खेळाडूंच्या चेहर्यावर दिसत होता. आता शेवटची कसोटी धर्मशाला येथे पुढील आठवड्यात सुरु होईल.
525 चेंडू खेळून काढल्या 202 धावा
भारताच्या चेतेश्वर पुजाराने कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा भारतीय विक्रम केला. याआधी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावे होता. पुजाराने रांची कसोटीत 525 चेंडूंचा सामना करताना 21 चौकारांसह 38.47 च्या स्ट्राइक रेटने 202 धावा काढल्या. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन द्विशतके झळकावली. हॅमंडने सर्वाधिक 4 द्विशतके काढली. ब्रायन लाराने 3 तर ग्रॅहम पोलॉक, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी 2 द्विशतके ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावली.
गोलंदाज प्रभाव टाकण्यात अपयशी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रांचीतील तिसरी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपली. चेतेश्वर पुजाराची द्विशतकी आणि वृद्धीमान साहाच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात कांगारुंवर आघाडी घेतली होती. चौथ्या दिवसाच्या तिस़र्या सत्रात भारताने 152 धावांची आघाडी घेऊन 9 बाद 603 धावांवर पहिला डाव घोषित केला.चौथ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना झटपट बाद करून जडेजाने त्यांना बॅकफूटवर आणले.पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात सावध सुरुवात करणा-या ऑस्ट्रेलियाला भारताने दोन फलंदाजांना बाद करत सामन्यावर पकड मजबूत केली होती. पण लंचनंतर पाचव्या विकेटसाठी शॉन मार्श (52) आणि पीटर हॅण्ड्सकॉम्ब (नाबाद 72) यांनी 124 धावांची भागीदारी रचून सामना अनिर्णीत राखण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावली.यावेळेत भारतीय गोलंदाज आपल्या गोलंदाजीचा प्रभाव दाखवू शकले नाही.हातात आलेली कसोटी त्याना गमवावी लागली.म्हणजे अनिर्णीत राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. भारताकडून जाडेजाने चार बळी घेत सामन्यात रंगत निर्माण केली. 525 चेंडूत 202 धावांची मॅरेथॉन खेळी करणार्या चेतेश्वर पुजाराला सामनावीर पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले.
पुजारा-साहाला रिव्ह्यूचा फायदा
पुजारा-साहा यांना रिव्ह्यूचा फायदा झाला. पॅट कमिन्सने साहाला पायचीत केले. पंचांनीही त्याला बाद दिले. साहाने रिव्ह्यू मागितले. रिव्ह्यूत साहा नाबाद ठरला. पुजाराला 157 च्या स्कोअरवर लॉयनने पायचीत केले. त्यानेसुद्धा रिव्ह्यू मागितले. तोसुद्धा नंतर नाबाद ठरला.
पुजाराचे द्विशतक
पुजाराने विकेटकीपर वृद्धिमान साहासोबत (117) सातव्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या विकेटसाठी ही भारताकडून सर्वात मोठी भागीदारी ठरली. पुजाराने आपल्या खेळीत 525 चेंडूंचा सामना करताना 21 चौकार मारले. 85 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुजारा पहिला भारतीय आहे, ज्याने 500 पेक्षा अधिक चेंडू खेळले. यादरम्यान तो 672 मिनिटे खेळपट्टीवर होता.
1000 धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर
साहाने करिअरचे तिसरे शतक काढले. साहा कसोटीत 1000 हजार धावांपासून 18 धावांनी मागे आहे. तर अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्यासुद्धा कसोटीत 1000 धावा पुर्ण करण्यासाठी काही धावा आवश्यक आहे.त्याने कसोटीत 988 धावा केल्या आहेत. यासामन्यात त्याने अष्टूपैलू कामगिरी केली. अष्टपैलू जडेजाने 55 चेंडूंत 5 चौकार, 1 षटकारासह नाबाद 54 धावा काढल्या.
2000 धावांचा पुजाराचा विक्रम
एका सत्रात प्रथम श्रेणीत 2000 पेक्षा अधिक धावा काढणारा पुजारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. एका सत्रात सर्वाधिक धावा काढण्याच्या विक्रमात त्याने 2016-17 सत्रात कोहलीला मागे टाकले. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 कसोटी सामन्यांत 1000 धावांचा टप्पा गाठला. याच बरोबर पुजाराने केलेल्या फलंदाजीमुळे भारताचा लळखळलेला डाव सावरला होता. त्याने आपल्या फलंदाजीमुळे कांगारु गोलंदाजांना चांगलेच वेसन घातले होते.