जळगाव । गोलाणी व्यापार संकुलात अस्वच्छता असते अशी ओरड होत असते.महानगर पालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असते. अस्वच्छतेची तक्रार उपविभागीय प्रांताधिकारी जलज शर्मा यांच्याकडे गेल्याने बुधवार रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्यासह शर्मा यांनी अस्वच्छतेबाबत पाहणी केली. एसडीएम जलज शर्मा आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांनी गोलाणी व्यापार संकुलात प्रवेशकरून एक कचरा कुंडी, शौचालय आदींची पाहणी केली.तळमजल्याची पाहणी करून हे अधिकारी रवाना झाले. या संदर्भात दै.तरुण भारतच्या प्रतिनिधींनी शर्मा यांच्याशी संवाद साधला असता. कचरा उचलण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.परंतु आपल्या गाळ्या समोरील कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी गाळेधारकाची सुध्दा आहे. पाहणीत अनेक ठिकाणी कचरा कचरा कुंडीत न टाकला खाली टाकण्यात आलेला दिसून आला आहे.लवकरच याबद्दल कारवाईसाठी नियोजन केले जाईल असे त्यांनी सांगीतले.