‘गोलाणी’तून पोलिसाची मोटारसायकल लंपास!

0

जळगाव । शहरातील गोलाणी मार्केटमधून बुधवारी सायंकाळी 7 वाजता पोलिस कर्मचार्‍याची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी राजेंद्र दशरथ पाटील (वय-54) हे बुधवारी 1 फेब्रूवारी रोजी गोलाणी मार्केटमध्ये कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी आपली मोटारसायकल क्रं. एमएच.19.एआर.4666 ही मार्केटमधील महेश प्रोव्हीजनसमोर उभी केली होती. काम आटोपून सायंकाळी 7 वाजता मोटारसायकल उभी केलेल्या ठिकाणी ते आले असता त्यांना मोटारसायकल दिसून आली नाही. यानंतर परिसरात मोटारसायकलचा शोध घेतला असता मिळून न आल्याने त्यांचा चोरी झाल्याची खात्री झाली. याबाबत आज रविवारी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीचा पूढील तपास बळीराम तायडे हे करीत आहेत.