गोलाणी कॉम्प्लेक्स परिसरात धाडसी घरफोडी

0

भुसावळ। शहरातील गोलाणी कॉम्प्लेक्स भागातील बंद घरात चोरट्यांनी घरफोडी करीत सोन्या चांदीच्या दागिण्यांसह 44 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना़ शनिवार 29 रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल
वरणगाव रोड लगत असलेल्या गोलाणी काम्प्लेक्स भागातील आशा केटरर्स जवळ असलेल्या आयुध निर्माणीतील कर्मचारी सपना निलेश शिंदे या बाहेरगावी गेल्या असता रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी करीत 30 हजार रुपयांची सोन्याची पोत, 10 हजार रुपये किंमतीचे 15 ग्रॅमची अंगठी, 4 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅमची चांदीची पैजन, 40 ग्रॅमचे जोडवे असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घरफोडीची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत सपना शिंदे यांच्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.