गोल्डसिटी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे उदघाटन

0

जळगाव प्रतिनिधी । कॉर्पोरेट दर्जाच्या मल्टीसुपर स्पेशालिस्ट गोल्डसिटी हॉस्पिटलचे उदघाटन दिंडोरी येथील गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याहस्ते संपन्न झाले.

गोल्डसिटी मल्टीसुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नामांकित तज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णांना आरोग्यविषयक सुविधा मिळणार आहेत. यात प्रामुख्याने हृदयविकार यात अँजिओप्लास्टी, बायपास अशा शस्त्रक्रिया, अ‍ॅक्सीडेन्ट पेशंट, किडनीचे विकार, कर्करोग य शस्त्रक्रिया अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध आहेत. अस्थिरोग उपचार विभागात २४ तास अपघातग्रस्त रुग्णांसाठी सेवा उपलब्ध आहे. मेंदूविकार, मणक्यांचे आजार , मधूमेह, छातीचे विकार, प्रसुती विभागात सर्वप्रकारच्या अत्याधुनिक व अद्ययावत आरोग्यविषयक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, लेप्रॉस्कोपिक शस्त्रक्रियांकरिता सुसज्ज असा शस्त्रक्रिया विभाग रुग्णसेवेकरिता आहे.
गंभीर आजारांवरील उपचारांसोबतच पॅथॉलॉजी, डिजीटल एक्सरे, २ डी इको सेवा, सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट या सेवादेखील एकाच छताखाली रुग्णांना उपलब्ध होणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधांमध्ये संपूर्णतः वातानुकुलित हॉस्पिटल, २४ तास अतिदक्षता विभागासह, रुग्णांकरिता हार्टलंग मशिन, अ‍ॅनेस्थेशिया, व्हेंटीलेटरसह सेंट्रलाइज मॉनिटरींग सिस्टीम व २४ तास मेडीकल उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या रुग्णांना आरोग्यविषयसुविधांचा लाभ व्हावा याकरिता डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल व मल्टी शेअरींग रुमची सुविधा देण्यात आली असून, रुग्णांच्या नातेवाईकांकरिताही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वप्रकारच्या रुग्णांना एकाच छताखाली सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच ओपीडीकरिता तज्ञ डॉक्टर राहणार असून, यात हृदयविकारासाठी डॉ.अमोल पाटील, डॉ.गणेश पाटील, डॉ.संदीप भारुडे, डॉ.चैतन्य शेटे, डॉ.सयाजी सरगर, लहान मुलांच्या हृदयविषयक समस्यांकरिता डॉ.ललित लवाणकर, छातीच्या विकारांसाठी डॉ.कल्पेश गांधी, जनरल व इर्मजन्सी मेडीसीन तज्ञ म्हणून डॉ.सुभाष चौधरी, डॉ.सुदर्शन पाटील, किडनी विकारांसाठी डॉ.देवदत्त चाफेकर, डॉ.अभय जोशी, डॉ.दिनेश महाजन, डॉ.जयेश वाघुळदे, मेंदूविकाराकरिता डॉ.संजीव हुजूरबाजार, अस्थिविकाराकरिता डॉ.हर्षवर्धन जावळे, सांधेरोपण उपचाराकरिता डॉ.मनीष चौधरी, डॉ.निरंजन चव्हाण, डॉ.योगेश मापारी, मणक्यांचे आजारांकरिता डॉ.ब्रिजभूषण महाजन, डॉ.निलेश भूते, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेकरिता डॉ.निलेश शिंपी, डॉ.मिलींद चौधरी, डॉ.जगमोहन छाबडा, डॉ.जगदीश बोरोले तर प्लॅस्टिक सर्जरीकरिता डॉ.श्रीराज महाजन अशी तज्ञ डॉक्टरांचा चमू उपलब्ध आहे. अद्ययावत सोईसुविधांनी रुग्णसेवेसाठी सज्ज असणार्‍या या गोल्डसिटी हॉस्पिटलमधील सेवांचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोल्ड सिटी हॉस्पिटलतर्फे संचालक डॉ.विकास बोरोले यांनी केले आहे.