गोव्याचे माजीमंत्री जॉन मानुवेल वाझ यांचे निधन

0

पणजी: गोव्याचे माजी नगरविकास तथा महसूलमंत्री जॉन मानुवेल वाझ यांचे शुक्रवारी आज हृदयविकराच्या झटक्याने (७९) व्या वर्षी निधन झाले. तीन दिवसांपूर्वी त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाच्या ७९ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉन मानुवेल वाझ १९९४ सालात अपक्ष म्हणून मुरगाव मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत निवडणून गेले होते. त्यांनी गोव्याचे नगरविकासमंत्री तसेच महसूलमंत्री पद सांभाळलेले आहे.