गोव्यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

0

गोवा : बागा आणि सीकेरी येथे समुद्रात बुड़ुन दोन देशी पर्यटकांचा मृत्यू झाला. दोन्ही पर्यटक तामीळनाडु येथील आहेत. धोक्याचा इशारा दिलेला असताना देखील पर्यटक समुद्रात उतरत असल्याने दुर्घटना वाढू लागल्या आहेत. गेल्या आठवडयात महाराष्ट्रातील ५ पर्यटकांचा कळंगुट समुद्रात बुड़ुन मृत्यू झाला होता.

काल मेंगलोर आणि तामीळनाडू येथील ८ पर्यटकांचा गट बागा येथील किनाऱ्यावर आले होते. या गटातील तिघे बागा किनाऱ्याच्या टोकास जाऊन जवळच्या खडकाळ भागात गेले होते. तेथे उभे राहून सेल्फी घेत असताना एका जोरदार लाटेच्या तडाख्याने तिघेही समुद्रात फेकले गेले. त्यातील दोघे धडपड करून समुद्रा बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र एकजण समुद्रात वाहून गेला. काही वेळाने त्याचा मृतदेह वाहून किनाऱ्यावर आला.