जळगाव। हिंदू राष्ट्र भावनेची ज्योत जगभरात पोहोचवण्यासाठी गोव्यात सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 14 जुने ते 17 जून या काळात हे अधिवेशन गोव्यातील श्री रामनाथ देवस्थान, फोंडा येथे होणार आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी भारत देशातील 21 राज्य, तसेच नेपाळ श्रीलंका आणि बांगलादेशमधील 150 हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदे मध्ये देण्यात आली.
हिंदू अधिवेशनात होणार विविध विषयांवर चर्चा
यावेळी सनातनचे संत नंदकुमार जाधव, विजय पाटील, रागेश्री देशपांडे, गोविंद तिवारी, निरंजन चौधरी आदी उपस्थित होते. सनातनचे संत नंदकुमार जाधव यांनी हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असून देखील हिंदुच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काश्मिरी हिंदूचे पुनर्वसन, कलम 370 रहित करणे, गोवंश हत्या बंदी, राममंदिराच्या पुर्ननिर्माण आदी विषयावर सरकारने कोणतीही पावले उचली नाही. जवानाच्या दगडफेकी त्यांच्या हत्या आखी रोखता आलेल्या नाही. जवानांवरील दगडफेक जा राजद्रोह असताना हिंदू संघटनानी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा निर्धार आयोजित अधिवेशनात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत आहे. आता होणार्या या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या विषयी माहिती देतांना हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते विजय पाटील यांनी बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंचा होणार वंशविच्छेद रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कोणत्या माध्यमातून प्रयत्न करायला हवेत याबाबत सुद्धा या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे सांगितले.