गो सेवा सदभावना पदयात्रेचे भुसावळात स्वागत

0

भुसावळ- तब्बल 14 हजार किलोमीटरची पदयात्रा पार करून लेह, लडाखपासून 24 जून 2017 पासून सुरू झालेल्या मो.फैजखान गुरुजीद्वारा काढण्यात आलेल्या सदभावना पदयात्रेचे सोमवारी शहरातील सुराणा साधना भवनात आगमन झाल्यानंतर शिक्षक नाना पाटील, गौतम चोरडिया, अभिलाष नागला, पंडित रवी शर्मा, रोहित महाले यांनी स्वागत केले. यावेळी रात्री आठ वाजता भुसावळ गोपालक गोसेवक बंधू-भगिनींसाठी साधना भवनात अनुभव कथन व गोमातेचे महत्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गो मातेसह वृक्ष व जलसंवर्धन काळाजी गरज
गुरुजींनी अनुभव कथन करताना त्यांचा पदयात्रेचा उद्देश सांगितला. त्यात देशी गाय संवर्धन, गो आधारीत शेती, गोहत्या, पर्यावरण, अखंड भारत वृक्षारोपण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. वृक्षतोडीमुळे प्रवासात रस्त्यात कुठे थांबावे मोठा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक पशू प्राण्यांना पिण्याचा प्रश्नही खूप ठिकाणी जाणवतो त्यामुळे वृक्षतोड, पाणी बचतीचे महत्व सांगण्यात आले. वृक्ष, पाणी, गाय यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सेवा प्रकाशन मुस्लिम राष्ट्रीय मंच राष्ट्रीय संयोजक मो.फैजखान यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोमातेच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार गोविज्ञान अनुसंधान केंद्र, हरीपुरा, ता.यावलचे उपाध्यक्ष सोनू मांडे यांनी केला. जैन सोशल ग्रुप व भगवान महावीर नवयुवक मंडळातर्फे प्रशांत कोटेचा व गौतम चोरडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे भुसावळ शहरात गोसेवा, विषयी विशेष कार्य करणार्‍या रोहित महाले, डॉ.भरत महाजन, टाक व बारा गोसेवक यांचा सत्कार फैजखान गुरुजी व नाना पाटील यांच्याकडून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

अंजाळेतील गो शाळेलाही भेट
यावेळी डॉक्टर भरत महाजन यांनी व गो सेवेसाठी वैद्यकीय सेवा आयुष्यभर मोफत करण्याची घोषणा केली. रोहित महाले यांनीही गोमाते विषयी मनोगत व्यक्त केले. गुरुजी सोबत असलेले पियुष भाई, कैलास जी. बाबाजी यांचा सत्कार रघुनाथआप्पा सोनवणे, डॉ.डी.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यशस्वीतेसाठी कमलेश निकम, रोहित महाले, कृष्णा साळी, अभिलाष नागला, नमो शर्मा यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक नाना पाटील सर व आभार प्रदर्शन नंदग्राम व शाळेचे संचालक अभिलाष नागला यांनी मानले. दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी आठ वाजता पदयात्रा अंजाळे येथील नंदिग्राम गो शाळेत रवाना झाले. नाना पाटील सर, गौतम चोरडिया, रोहित महाले, निशांत पाटील, चंद्रशेखर जंगले पदयात्रेत सहभागी झाले.