गो-रक्षेच्या मुद्द्यावरून कोणीही सहकार्य करत नसल्याने भाजप खासदाराचा राजीनामा !

0

हैदराबाद : आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे तेलंगणाचे खासदार टी.राजा सिंह लोध यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. ते गोशमहल विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. मी भारतीय जनता पार्टीकडे राजीनामा सोपावल्याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर शेअर केला. माझ्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये असे मला वाटते असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

भाजपवर नाराज
गोरक्षेच्या मुद्द्यावर मला कोणी सहकार्य करत नसल्याचा आरोप राजा सिंह यांनी भाजपावर केला होता. ‘तेलंगणामध्ये गोहत्या बंद व्हायला हवी, आम्हाला तिथे कोणतीच गडबड नको आहे’ असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. रस्त्यावर उतरून गोहत्येवर बंदी आणू अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली. माझ्यासाठी हिंदू धर्म आणि गोरक्षा हे पहिले येत, त्यानंतर राजकारण येते असे राजा सिंह यांनी सांगितले.