पाचोरा – शहरातील गो.से.हायस्कूलमध्ये महात्मा गांधी जन्मदिवस हा नई तालीम दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ केला. परीसर स्वच्छता ठेवणाऱ्या व्यक्तींचा मुख्याध्यापक एस.डी.पाटील यांच्याहस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 26 सप्टेंबर ते 2 आक्टोबर हा सप्ताह नई तालीम सप्ताह म्हणून शाळेमार्फत साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध लघु उद्योग करणारे व्यक्तींच्या विद्यार्थ्यांसमोर मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाविषयी माहिती मिळवून दिली. त्याचबरोबर स्वच्छता अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईडच्या संघामार्फत व स्काऊट मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा रेल्वेस्टेशन स्वच्छ केले.
यांची होती उपस्थिती
संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, मानद सचिव महेश देशमुख तसेच शालेय समिती चेअरमन खलील देशमुख यांनी मुख्याध्यापक एस.डी.पाटील, उपमुख्याध्यापक एल.एस.शिंपी, पर्यवेक्षक बी.डी.बोरुळे, पर्यवेक्षिका प्रमिला पाटील, सी.एस.धुळेकर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रमिला वाघ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.