गौण खनिजाची अद्याप केवळ एक टक्का वसुली

0

तळोदा । गौण खनिज वसुलीसाठी तळोदा महसूलास जिल्हा प्रशासनाने चार कोटीचे उद्दिष्ट दिले असले तरी आतापर्यंत केवळ 4लाख म्हणजे 1% झाली आहे . त्यामुळे उद्दिष्ट पूर्तीचे प्रशाससनापुढे ऐक प्रकारे आव्हानच ठाकले आहे. तळोदा तालुक्यात अवैध अवैध गौण खनिज वसुली प्रकरणी प्रशासनाने मोठ्या धुमधड्याक्यात मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहे.

घरकुलांसाठी रेती मिळत नाही
आपले वाहन पकडल्यानंतर प्रशासनाकडून मोठी रक्कम केली जात आहे त्यामुळे ठेकेदारांनीहीवाळूची वाहतूक करने बंद केले आहे. त्यामुळें संपूर्ण बांधकाम व्यावसायिकच प्रभावित झाला आहे कारण ठेकेदार हे हातोडा नदीवरील वाळू नजीक पडते साहजिकच ही वाळू स्वस्थात मिळत असलल्याने घर मालक व बांधकाम धारक ही वाळू पसंद करतो परंतु प्रशासनाने ह्या वाटेवरीलच वाळूवर लक्ष केल्याने तेथून वळू आणणे ठेकेदाराला कठीण झाले आहे. वाळू अभावी बांधकामेच बंद पडली आहे. या व्यवसायावर 30 टक्के मजुरांना रोजगार मिळतो. मात्र सध्या स्तिथीत रोजगाराचा मोठा बिकट प्रश्‍न निर्माण झाला आहे. ठेकेदारा बरोबरच प्रशासनाने तालुक्यातील घरकुलांनाही रॉयल्टीचा फास आवळला आहे कारण घरकुलांसाठी रेती मिळत नसल्याची व्यथा लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. वास्तविक तालुक्यात रेतीचा घाट नाही जो घाट आहे तो हातोडा गुजरात हद्दीत आहे असे असतांना जिल्ला प्रशासनाने रेती, खाडी, डबर, मुरूम अशा गौणखनिजांवर तब्बल 4 कोटीचा उद्दिष्ट दिले आहे. महसूल प्रशासनानेही वसुलीसाठी धडक कार्यवाही सुरु केली असली तरी प्रशासनाला लाभार्थ्यांसह, ठेकेदार, मजूर यांचा रोष पत्करावा लागत आहे.