गौण खनिजाची अवैध वाहतूक, ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त

0

रावेर– तालुक्यातील भोकर नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरसह ट्रॉली तलाठ्यांनी जप्त केली. गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अवैधरीत्या वाळूची नदीपात्रातून वाहतूक होत असताना रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी हर्षल पाटील, तलाठी एम.ई.तायडे यांनी वाहन दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेत तहसील कार्यालयात आणले. दरम्यान, कारवाईनंतर राजरोस अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याने कारवाईत सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.