शिंदखेडा । यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्तविद्यापीठ नाशिक मार्फत श्री.शि.वि.प्र.स.चे महाविद्यालय शिंदखेडा येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना ग्रंथालयाची उपयुक्तता याविषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे उद्घाटन प्राचार्य डॉ.बी.आर.चौधरी यांनी केले. व्यासपीठावर डॉ.तुषार पाटील, आयोजक डॉ.संभाजी पाटील, प्रा.एस.टी.राऊळ, प्रा.पंकज भदाणे, प्रा.आर.एन.पाटील, प्रा.एस. बी.बोरसे आदींची यावेळी उपस्थिती होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणार्या ग्रंथांची ओळख व्हावी व स्पर्धा परीक्षा विषयी त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ.संभाजी पाटील यांनी सांगितले.
सृजनशिलता गरजेची
स्पर्धा परीक्षा ही कठीण असते ही मनातील भीती आधी विध्यार्थानी दूर केली पाहिजे व जिद्द ,चिकाटी, मेहनत करून यश संपादन करणे शक्य आहे असल्याचे डॉ.तुषार पाटील यांनी सांगितले. ध्येय साध्य करण्यासाठी सृजनशीलता अंगी असणे गरजेचे आहे त्यासाठी न्यूनगंडाची भावना काढून टाकणे गरजेचे असल्याचे प्राचार्य डॉ.बी.आर.चौधरी यांनी सांगितले.
148 विद्यार्थ्यांचा सहभाग
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इ. वायूनंदन, परीक्षा नियंत्रक डॉ.अर्जुन घातोडे, विद्यार्थी सेवा अधिकारी डॉ.आतकारे, विभागीय संचालक डॉ.धनंजय माने, महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री.प्रफुल्लकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, उपप्राचार्य सी.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र संपन्न झाले. यशस्वीतेसाठी प्रा.एस.के.जाधव, प्रा.एस.बी.सावंत, एन.बी.भामरे, डी.डी.पाटील, अमरीश राऊळ, भटू देसले, आकाश बागले, रवी अहिरे यांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रात 148 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.