ग्रामपंचायत अपात्र प्रकरणे जिल्हाधिकारी हाताळणार

0

जळगाव । ग्रामपंचायत पंचायत विषय असलेले दावे, निवडणुका याबाबत उपजिल्हाधिकारी याकडे होते.मात्र यापुढे हे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी याच्या सोपविण्यात आले आहे. असे आदेश शासनाने काढले आहे.त्यामुळे पेंडिग असलेले अपात्र प्रकरणे यापुढे जिल्हाधिकारी यासमोर सुनावणी होणार आहे. शासनाने जिल्हाधिकारी याच्या कामाची विभागणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी अपर जिल्हाधिकारी असे पद निर्माण केले होते.शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्रमांक एस-14/3613/प्र.क्र.209 (2) /ई-3 दिनांक 3 एप्रिल 1992 अन्वये जिल्हधिकारी कामाची विभागणी केली होती. यामध्ये मुंबई ग्रामपंचायस अधिनियमाखालील निवडणूकांसह ग्रामपंचायत विषयक सोपविण्यात आले होते.