ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा

0

15 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान राबविली जाणार निवडणूक प्रक्रिया

यंदा प्रथमच लोकनियुक्त सरपंच होणार; महिलांसाठी 66 टक्के आरक्षण

धुळे । जिल्ह्रातील नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या विविध ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. या निवडणूका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असल्या तरी आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती बालेकिल्ला नेमका कोणाचा हे यावरुन ठरणार आहे. त्यादृष्टीने या निवडणुकीकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. राज्यात पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. एरवी राजकीय पक्षाचे दिग्गज पदाधिकारी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी कधीही गावात फिरकत नव्हते असे बढे पदाधिकारी देखील या निवडणुकीकडे विशेष लक्ष देत आहे.

साक्री तालुक्यातील 33 गावे
साक्री तालुक्यातील नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या 33 गावातील ग्रामपंचयत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात भामरे, बळसाणे, जाभोरे, वरसुस, कालदर, भोनगाव, सुकापुर, दरेगाव, खरडबारी, वाकी, भडगाव, नागपुर, कुडाशी, जमखेल, पांगण, काळटेक, पिपळगाव बु, बसरावळ, चरणमाळ, कासारे, तमासवाडी, वसमार, धाडणे पेटले, उभंड, पानखेडा, खरगाव, दहिवेल, किरवाडे, जांभोरे, आमोडे, देशीरवाडे, देगाव, भाडणे अशा 33 ग्रामपंचारतीच्या निवडणूका होणार आहे. रा 33 पैकी 20 ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे.

भामेर येथे साडेतीन हजार मतदार
साक्री तालुक्यातील भामेर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत पाच वॉर्डातील 13 जागांसाठी 1 हजार 802 पुरूष व 1 हजार 625 महिला असे 3 हजार 427 मतदार मतदानाचा हक्क बजविणार आहे. भामेरसह शिवाजीनगर रायपूर, जगतपूर, जयश्री, जयभिम नवागाव ही गावे पाच वॉर्डात विभागली गेली असून वॉर्ड नं. 1 ते 3 मध्ये एका मतदाराला सरपंचासह चार मतदान देण्याचा अधिकार आहे. 4 व 5 वॉर्डात सरपंचासह तीन मतदान देता येणार आहेत.

कार्यक्रम पुढीलप्रमाणे
या ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मूदत 15 ते 22 सप्टेंबर पर्रत आहे. अर्जाची छाननी 25 सप्टेंबर, माघारीची मूदत 27, अंतीम यादी व चिन्ह वाटप 27 सप्टेबर दुपारी 3 वाजेनंतर तर मतदान 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. निकाल-9 ऑक्टोंबर रोजी होणार जाहीर होणार आहे. तालूक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांची नोटिस तहसिलदार रोहिदास वारूळे यांनी प्रसिध्द केली. त्यानुसार निवडणुक होणार्‍या गावात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. सरपंचाची निवड थेट जनतेमधुन होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदखेड्यातील 23 ग्रा.पं.साठी
तालूक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. तालूक्यातील 23 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गोराणे, पाष्टे, दराणे, कलमाडी, वारूड, पिंप्राड, नरडाणा, माळीच, अमळथे, कळगांव, जोगशेलू, चिमठाणे-दलवाडे, आरावे, सतारे, रोहाणे, निमगूळ, रामी, कुरूकवाडे, साहूर, वणी, नेवाडे, वरसूस, विटाई अश्या एकूण 23 ग्रामपंचायती आहेत.