निवडणूक आयोगाकडून अंशतः बदल ; जिल्ह्यात 58 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक
भुसावळ :- राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका 25 ऐवजी 27 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. निवडणूक आयोगाचे अवर सचिव री.वि.फणसेकर यांनी 9 रोजी त्याबाबत सुधारीत अध्यादेश जारी केला आहे. यापूर्वी 26 रोजी जाहीर होणार निकालही पुढे ढकलण्यात आला असून तो 28 रोजी जाहीर केला जाणार आहे.
जळगाव जिल्ह्यात 58 ग्रामपंचायतीसाठी सार्वजनिक तर 132 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे. सुधारीत निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा तर 12 पर्यंत अर्ज दाखल करता येतील तसेच 24 रोजी छाननी होईल. 16 रोजी माघार होऊन दुपारी तीन वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप होईल. 27 रोजी मतदान तर 28 रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.