नवापूर : राष्ट्रीय महामार्ग रस्ता क्र6 वरील रायंगण पुलावरील रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. अधिकाऱ्यांना जाग येत नाही म्हणुन रायंगण गांवाच्या ग्रामस्थांनी टिकाव-फावडे घेऊन मुरूम टाकून पुलावरील जीवघेणे खड्डे बुजवून अनोखा उपक्रम केला आहे. या पुलाची दुरूस्ती व खोल खड्डे भरण्याची वेळोवेळी मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु पुलाची दुरूस्ती व खड्डे बुजविण्यात आले नाहीत. शेवटी रायंगण व कोठडा च्या गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातुन खड्डे बुजवले.
नवापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास पाटील, पो.का.निजाम पाडवी, योगेश थोरात, मुकेश पवार, नवलसिंग गावीत, रायंगण गावाचे सरपंच अजित गावीत, कोठडा गावाचे सरपंच सुरेश गावीत, माजी उपसभापती दिनकर मावची, पागराणचे सरपंच सुरेश गावीत, विपुल वसावे, अतुल ठीगळे, विरसिंग कोकणी, महेन्द्र गावीत, दामु गावीत, संदिप वसावे, भिमसिंग गावीत आदींनी पुलाच्या शेजारी असलेल्या शेतातून खोदकाम करून मुरूम माती पुलाच्या रस्त्यावर टाकुन खड्डे बुजण्याचे काम केले.
रायंगण पुल हा 60 फुट उंच असल्यामुळे या पुलावर बरेच अपघात होऊन जीवितहानी झालेली आहे. मात्र कंत्राटदर व संबधित अधिकारी या पुलावर दुर्लक्ष करीत आहे. या पुलावर यापुढे अपघात झाल्यास संबधित राष्ट्रीय महामार्ग क्र 6 चे अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रायंगण व कोठडा ग्रामस्थांनी केली आहे. मागच्या दोन महिन्या पुर्वी पुलाचे संरक्षण कठडे व पुलाचा खालच्या भागातील पिलर दुरूस्तीचे काम स्वता जिल्हाधिकारी डाॅ.मल्लीनाथ कल्लशेट्टी यांनी हे काम स्वता उभे राहुन काम सुरू केले होते.