ग्रामसेवकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार शिरसाट यांचा निषेध
ग्रामसेवक संघटना आक्रमक ; भुसावळ विभागात तहसीलदारांना निवेदन
भुसावळ : ग्रामसेवकांविषयी अपशब्द वापरणार्या औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांचा भुसावळ विभागातील ग्रामसेवक संघटनांनी निषेध केला आहे. आमदारांवरव गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठिकठिकाणी तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
भुसावळात तहसीलदारांना निवेदन
भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे यांना निवेदन देण्यात आले. आमदारांविरोधात गुन्हा न दाखल झाल्यास राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष प्रीतम शिरतुरे, उपाध्यक्ष रत्नाकर चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खैरनार, सचिव राकेश मुंडके, जिल्हा चिटणीस संजय भारंबे यांच्यासह आर.एन.पाटील, जी.ए.वाडे, पी.सी.पारधी, आर.पी.तायडे, आर.व्ही.घुले, एम.ए.तायडे, डी.सी.इंगळे, आर.एस.बोदडे, ए.एफ.सुरवाडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
यावलमध्ये प्रशासनाला निवेदन
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने यावल तहसीलदार महेश पवार व प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर व यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना निवेदन देण्यात आले. औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करतांना शासकीय व्यासपीठावरून ग्रामसेवकांविषयी अपशब्द ग्रामसेवकांची बदनामी केली. त्याचप्रमाणे चिथावणीखोर शब्दाचा वापर करून ग्रामविकासात सरपंच व ग्रामसेवक यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील ग्रामसेवकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आमदार संजय शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामसेवकांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले. यावेळी यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पुरूषोत्तम व्ही.तळेले, सहसचिव हितेंद्र महाजन यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.