कल्याण : कल्याण तालुक्यातील ग्रामसेवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आली आहे. रघूनाथ हरड असं मृत ग्रामसेवकाचे नाव असून वाकळण ग्रामपंचायतमध्ये ते कार्यरत होते. ही घटना वाकळण गावात घडली. याप्रकरणी शील डायघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.