चाळीसगाव। तालुक्यातील तामसवाडी येथे ग्रामपचांयत हद्दीतील मिळकत (प्लॉट) 111 हि 1995 साली तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच यांनी महिलेच्या नावावर बोगवटा लावून ती मिळकत सन 2003-2004 मध्ये मूळ मालकाला वगळून त्या महिलेच्या व मुलाच्या नावे लावणार्यावर कारवाई करून सदर मिळकत मूळ मालकाच्या नावे लावावी अशी मागणी तक्रारी अर्जाद्वारे मीनाबाई तात्या निकम या महिलेने ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
तक्रारदार तामसवाडी येथील रहिवाशी असून त्यांचे पतीचे मामा काळू सदा बोराडे यांची तामसवाडी येथे मिळकत क्र 111 (30द30 चा प्लॉट) होती. व काळू बोराडे आणि त्यांच्या पत्नी यांना मुलबाळ नसल्याने त्यांचे पालनपोषण त्यांच्या कुटुंबीयांनी केले होते. अर्जदार महिला या कुटुंबासह 1990 साली मुंबई येथे उदरनिर्वाह साठी गेल्या असता व मिळकतीचे मूळ मालक काळू सदा बोराडे व त्यांच्या पत्नी यांनी कोणाला हि खरेदी खताने मिळकत विक्री केलेली नसतांना व ते 1982 व 1988 साली मयत झाले असतांना 1995 साली तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच यांनी संगनमत करून भोगवटा धारक म्हणून सत्यभामा सुकराम बाविसकर या महिलेचे नाव लावण्यात आले व त्यानंतर सन 2003 व 2004 मध्ये मूळ मालक म्हणून काळू सदा बोराडे यांचे नाव कमी करून भोगवटा धारक सत्यभामा सुकराम बाविस्कर व दिलीप सुकराम बाविस्कर यांचे मूळ मालक म्हणून नाव लावण्यात आले. व सदर मिळकत हि वरील तिघांनी संगनमत करून बळकावण्याचा प्रयत्न केला. 28 फेब्रुवारी 2015 रोजी दिलीप सुकराम बाविस्कर यांचे नाव ठराव क्र.7 नुसार लावण्यात आले. काळू बोराडे यांच्या जागेवर बांधकाम सुरु असल्याची माहिती मीनाबाई तात्या निकम यांना मिळाल्यावरून त्यांनी तामसवाडी गावी येऊन शहनिशा केली असता त्या जागेवर घरकुल योजनेचे बांधकाम सुरु असल्याचे दिसल्याने त्यांनी तामसवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री सोनवणे यांना दि 11 एप्रिल 2017 रोजी सुमनबाई प्रल्हाद निकम यांनी अर्ज देऊन सदर बांधकाम जागेच्या मालकी हक्काबाबत शहनिशा होईपर्यंत बांधकाम थांबवण्याची विनंती केली होती तरी देखील बांधकाम न थांबल्याने मीनाबाई तात्या निकम यांनी सदर बांधकाम थांबवून त्या मिळकतीवर वरील बाविस्कर यांचे नाव कमी करून मूळ मालकाचे नाव लावण्यात यावे अशी मागणी केली आहे.