ग्रामस्थांना कर भरण्याचे आवाहन

0

शिरूर । शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ग्रामपंचायतीची करवसुली मोहीम सुरू झाली आहे. देय असलेला कर भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच दीपक रत्नपारखी, उपसरपंच दिपाली गायकवाड, ग्रामविकास अधिकारी मिलिंद महाले यांनी केले आहे.

सन 2017 -18 साठीची ग्रामपंचायत करवसुली मोहीम सुरू असून मार्च अखेरपर्यंत 100 टक्के करवसुली करण्याचा मानस असल्याचे सरपंच दीपक रत्नपारखी यांनी सांगितले आहे. याकरीता ग्रामपंचायतीस देय असलेली चालू आणि थकीत असलेली करबाकी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले आहे. आतापर्यंत जेमेतेम 20 टक्के कर वसूली झाली आहे. कर जमा करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वेच्छेने सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी महाले यांनी केले आहे. सध्या गावात कर भरण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कर वसुलीसाठी सर्व सदस्यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत कर्माचार्‍यांची पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके घरोघरी भेटी देऊन करवसुली मोहीम तीव्र करणार असल्याचेही महाले यांनी सांगितले.