ग्रामिण शिवारात जलसंधारण कामाचा झाला शुभारंभ

0

शहादा । सुलवाडा,म्हसावद व टवळाई येथील सर्वात जुन्या नाल्यात पी.के.अण्णा पाटील फाउंडेशनचे पोकलँड मशिन जलसंधारण्याच्या कामाची सुरुवात रोहिदास मक्कन पाटील व्हा.चेअरमन लोकनायक जयप्रकाश नारायण सुतगिरणी यांचे हस्ते करणेत आले.संपुर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे तसेच पाणी आडवा पाणी जिरवाची कामे सुरु आहेत. विविध सेवाभावी संस्था व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भरीव कामे होत आहेत.

फाऊंडेशनची होतेय मदत
शहादा तालुका मागे नसुन पी.के.अण्णा पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी पोकलँन्ड मशीन याकामी उपलब्ध करून दिलेले आहे. कौठळ त.श.येथे जिल्हाधिकारी व महसुल खात्याचे अधिकारी यांचे समवेत उद्घाटन करणेत आले होते तेथील काम पुर्ण होऊन सुलवाडा,म्हसावद व टवळाई या गावांच्या शिवारातुन जाणारा सर्वात जुन्या नाल्याचे 2 मी.रुंद 3 मी.खोल 1225 मी.लांबीचे काम हाती घेण्यात आले असुन 4 ते 5 दिवसात दिवसरात्र हे कामपुर्ण होईपर्यंत सुरु राहीज अशी माहीती पी.के.अण्णा पाटील फाउंडेशनचे सल्लागार तथा सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर.पाटील यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळेस रोहिदास मक्कन पाटील,उत्तम बाबु पाटील,काशिनाथ सुपडु पाटील, सांय तुकाराम पाटील, किशोर सोमजी पाटील, संजय विक्रम पाटील, अनशुंमन गोपाळ पाटील, युवराज हिरालाल पाटील, विलास तुकाराम पाटील, स्वप्नीन सुरेश पाटील,भरत नरोत्तम पाटील, सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संपादक पी.आर.पाटील व जनल मॅनेजर अशोक सुपडु पाटील यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ झाला.