अमळनेर । 2 मे रोजी पाकिस्तानी सैन्यानी घूसखोरी करीत भारतीय हद्दीत पुंछ भागात भारतीय सिमा सुरक्षा दलाच्या जवानांवर भ्याड हल्ला करुन सैनिकांच्या मृत देहाची विटबना केल्याने, या भ्याड हल्लयाच्या अखिल भारतीय संघटना अमळनेर तालुक्याच्या सर्व पदाधिकार्यांकडून प्रांतधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देऊन निषेध नोंदविन्यात आला. या निवेदनात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे नायब सुभेदार परमजीत सिंह आणि जवान प्रेमसागर यांच्यावर जम्मू काश्मीर येथील पुंछ भागात पाकिस्तानी सैन्याकडून घुसखोरी करत भ्याड हल्ला करण्यात आला.व त्यांच्या मृत देहाचे वितंबना केल्याने देशातील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी
शहीद सैनिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात तालुक्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे अमळनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी सहभागी असून मानवाला काळीमा फासणारे कृत्य करणार्या पाकिस्तानी सैन्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे निवेदन देण्यात आले. जिल्हाउपाध्यक्ष संभाजी देवरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.जयश्री साळुंखे, तालुकाध्यक्ष वसंतराव पाटील, उपाध्यक्ष प्रा.हिरालाल पाटील,यदुवीर पाटील,कार्याध्यक्ष कुंदन खैरणार ,जेष्ठ पत्रकार विजय पाटील,जयवंतलाल वानखेड़े, संजय सुतार, प्रा.विजय गाढे, मिलिंद निकम, अजय भामरे, गणेश चव्हाण, जयपाल गिरासे, चेतन सुतार, गजानन पाटील, राहुल देसले, शशिकांत पाटील, रविंद्र कढरे, सोमा कढरे, कमलेश वानखेडे, शिवाजी पारधी आदी पत्रकारांनी प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन निषेध नोंदविला.