ग्रामीण भागातही पल्स पोलिओला उस्फुर्त प्रतिसाद

0

शिक्रापूर : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेला ग्रामीण भागातही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळ पासूनच लसीकरण केंद्रावर पालकांच्या लहान मुलांना घेऊन रांगा लागल्या होत्या. तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दोन दिवस आधीपासून प्रत्येक गावामध्ये पल्स पोलिओ बाबत जनजागृती करत पत्रके व फलक लावण्यात आले होते.

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या पल्स पोलिओ अभियानाला रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुरवात करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, ग्रामपंचायत पारोडीचे सरपंच विकास शिवले, उपसरपंच चैताली राहुल शिवले, ग्रा.प.सदस्य गणेश टेमगिरे, निमगाव म्हाळुंगी गावचे पोलीस पाटील किरण शेठ काळे ,वन व्यवस्थापन समीती अध्यक्ष लालासो येळे, ग्रा.प.सदस्य निलीमाताई सचिन सातकर, आरोग्य सेविका सुवर्णा वीर मॅडम, आशा वर्कर ज्योती लोखंडे,विमल लोखंडे, स्वप्नील टेमगिरे, सुशांत टेमगिरे, पोपट भालेराव यांसह आदि उपस्थित होते.