जळगाव । तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांची अत्यंत दयनीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळेे एका जणाचा काही दिवसांपूर्वी एका जणाचा मृत्यु झाल्याची घटना घडली. त्यामुळे तात्काळ धरणगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लावण्यात यावा, प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेनेतर्फे सेना स्टाईलने आंदोलन करु असा इशारा शिवसैनिकांतर्फे देण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयासंबंधी विविध मागण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सकांना निवेदन देण्यात आले. धरणगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहे. दरम्यान 1 रोजी खलील तडवी यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू याठिकाणी डॉक्टर नसल्याने तडवीचा मृत्यु झाल्याची घटना घडली.
मंत्र्याची सुचना
या घटनेची दखल घेवून सहकारराज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नियुक्तीची सुचना दिली. परंतू वैद्यकीय अधिकारी नियुक्त झालेला नाही. त्यामुळे तात्काळ निवासी वैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती करावी व त्यांच्याकडे अधिक्षकाचा पदभार देण्याता यावा. ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक हे गेल्या 6 महिन्यांपासून सेवानिवृत्त झाले आहे. परंतू त्यांनी अद्यापही पदभार सोडलेला नसून त्या पदावरी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
डॉक्टरांनी थांबावे
ग्रामीण रुग्णालयात असलेली एक्स-रे मशिन गेल्या 3 वर्षांपासून बंद असून ते तात्काळ दुरुस्त करावे, नियमानुसार प्रत्येक कर्मचारी नियमानुसार निवासी थांबले पाहीजे तर पद मंजूरीनुसार चार वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी या मागण्यांसाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुनिल भामरे, अतिरीक्त शल्यचिकीत्सक डॉ. कीरण पाटील यांना धरणगावातील शिवसेनेच्या पदाधिकार्यांतर्फे निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
निवेदन दिल्यानंतर तीन दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शल्य चिकीत्सकांनी पदाधिकार्यांना दिले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुलभूषण पाटील, राजेंद्र महाजन, पप्पू भावे, विलास महाजन, जितेंद्र धनगर, भागवत चौधरी, हेमराज पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.