ग्राहकांच्या चुकीमुळे एसबीआयने कमविले ३८ कोटी

0

मुंबई-ग्राहकांच्या चुकीमुळे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने गेल्या साडेतीन वर्षात ३८ कोटी ८० लाख रुपयांची कमाई केली आहे. धनादेशावरील स्वाक्षरी न जुळल्याने एसबीआयने एवढी रक्कम ग्राहकांच्या खात्यातून कमी केली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने गेल्या साडेतीन वर्षात 24 लाख ७१ हजार ५४४ लाख धनादेश स्वाक्षरी न जुळल्याने परत पाठवले. एका माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

वर्षनिहाय परत गेलेले धनादेश
कोणताही धनादेश परत होतो (चेक रिटर्न) त्यावेळी बॅंकेकडून १५० रुपये चार्ज आकारला जातो, तसेच त्यावर जीएसटीही लागतो. म्हणजे प्रत्येक चेक रिटर्न झाल्यावर खातेदाराला १५७ रुपयांचा भुर्दंड बसला. आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ६० हजार १६९ चेक परत गेले आहे. २०१६-१७ मध्ये ९ लाख ९२ हजार ४७४ , २०१७-१८ मध्ये ७ लाख ९५ हजार ७६९, २०१८-१९ मध्ये ८३ हजार १३२ चेक परत गेले आहे.

मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने दंड
यापूर्वी जानेवारीमध्ये आलेल्या एका अहवालानुसार एसबीआयने खात्यामध्ये किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) न ठेवणाऱ्यांकडून १७७१ कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले होते. मिनिमम बॅलन्स म्हणून वसूल करण्यात आलेली ही रक्कम एसबीआयच्या दुसऱ्या तिमाहीच्या नेट प्रॉफिटपेक्षाही जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एसबीआयचं नेट प्रॉफिट १५८१.५५ कोटी रुपये होते.