आमदार संजय सावकारे ; तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम
भुसावळ- भ्रष्ट्राचार थांबविण्यासाठी ग्राहकांनी देखील जागृक राहिले पाहिजे. ग्राहकांनी दुकानदारांकडून पक्के बिल घेणे गरजेचे असून ग्राहक दिनाला संबंधित सर्व विभागांचे अधिकार्यांना बोलावून घेतले पाहिजे जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन होऊ शकते, असे स्पष्ट मत आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्राहक हक्काविषयी कायद्याचे मार्गदशन गरजेचे
आमदार सावकारे म्हणाले की, ग्राहक चळवळीची जनजागृती युवकांमध्ये प्रभावीवणे करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले पाहिजे. नवीन पिढीला ग्राहकांचे हक्क व अधिकारांची माहिती होण्यासाठी कायद्याविषची सखोल मार्गदर्शन त्यांना दिले पाहिजे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन स्तरावर वेळोवळी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सावकारे पुढे म्हणाले की, ग्राहकांना कायद्याची व आपल्या हक्काची जाणीव व माहिती मिळावी यासाठी महसूल प्रशासनाने कार्यालयीन आवारात याविषयी दर्शनी फलक लावण्याच्या सुचना केल्या. त्यामुळे ग्राहकांना कुठे व कोणत्या प्रकारची तक्रार करावी याविषयीचे सखोल ज्ञान मिळू शकेल.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष उदय सुर्यवंशी, प्र.ह.दलाल, मिलिंद मांडाळकर, नगरसेवक मुन्ना तेली, गजानन जोशी, संजय शुक्ल, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार आर.एल. राठोड, ज्ञानेश्वर सपकाळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ग्राहक कायद्याची माहिती सांगितली. वस्तूंच्या खरेदी विक्री प्रमाणेच मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारात देखील फसवणूकीचे प्रकार होत असल्याचे त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.