भुसावळ । शहर व तालुका शिवसेनेतर्फे तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संरक्षण कक्षाचे निर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख अॅड. श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख मुकेश गुंजाळ, उपेंद्र इंगळे, पूनम बर्हाटे, उज्वला बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यांना मिळाली नविन जबाबदारी
प्रसंगी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जळगाव जिल्हातील मुक्ताईनगर विधानसभा उपजिल्हा प्रमुखपदी उपेंद्र इंगळे तर भुसावळ व यावल विधानसभा उपजिल्हा प्रमुखपदी नितिन देशमुख, भुसावळ तालुका प्रमुखपदी देवेंद्र पाटील, भुसावळ शहर प्रमुखपदी मनोज पवार यांची नियुक्ती सहा महिन्यांकरीता करण्यात आली. याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपशहर प्रमुख राकेश खरारे, शिक्षक सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, जेष्ठ शिवसैनिक अबरार शेख (ठाकरे), अशोक जाधव, दिवाकर विसपुते, माजी नगरसेवक पप्पू बारसे, विभाग प्रमुख उमाकांत शर्मा, प्रा.धिरज पाटील, सोनी ठाकुर, राजेश ठाकुर, नीलेश महाजन, बबलू बर्हाटे, अनिल बागुल, लोकेश ढाके, किशोर शिंदे, शरद जोहरे, अबरार खान, सूरज पाटील, मृगेन कुळकर्णी, जग्गू खेराडे, नामदेव बर्हाटे, सनी चौधरी, वरूण भागवत, मंदार बागुल, शेख मेहमूद, मुंबई चेंबूर येथील शिवसेना महिला आघाडी सदस्या रेहाना शहा, निखिल चौधरी आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.धिरज पाटील, सूत्रसंचालन प्राचार्य विनोद गायकवाड़ यांनी केले तर आभार नमा शर्मा यांनी मानले.