रावेर :- ग्राहक संरक्षण परीषदेच्या सदस्यपदी मोरगाव येथील जिल्हा परीषद सदस्य रंजना प्रल्हाद पाटील यांची निवड करण्यात आली. ग्राहक सरंक्षण परीषदेचा पदाधिकार्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे रीक्त झालेल्या पदासाठी परीषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी नऊ अशासकीय सदस्याची निवड केली.
त्यात रावेर तालुक्यातून रंजना पाटील यांचा समावेश आहे. निवडीबद्दल पंचायत समिती सदस्य जितू पाटील, जुम्मा तडवी, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, माजी आरोग्य सभापती सुरेश धनके, महेश पाटील, सुधाकर महाजन आदींनी गौरव केलजा.