शिरपूर। शिरपूर पंचायत समिती अंतर्गत येणारी ग्रामपंचाय असली येथे कार्यरत ग्रामसेवक रविंद्र काशिनाथ पाटील यांना पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एम.डी. बागूल यांनी निलंबनाची कार्यवाही केली आहे. यात कर्तव्यात कसुर करणे आणी आर्थिक गैरव्यवहार करण्याचे आरोप ग्रामसेवक आर.के.पाटील यांच्यावर करण्यात आले होते. या बाबात धडक कार्यवाही करत थेट निलंबन करुन कर्तव्यात कसुर करणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारल्यामुळे शिरपूर पंचायत समितीची मलिन झालेली प्रतीमा सुधारण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा या निमीत्ताने होत आहे.
परस्पर रक्कम खर्च करण्याचा आरोप
याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर पंचायत समिती अतंर्गत असलेली ग्रा.पं.असली व शिंगावे या ग्रामपंचायतीचा पदभार हा पाटील यांचे कडे होता.विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांनी ग्रामपंचायत असली येथे भेट दिली असता सदर ग्रामसेवक कार्यालयता गैरहजर आढूळण आले आहे. तसेच आवश्यक दप्तराची पाहणी करण्याकरता मागणी करुन देखिल ते उपलब्ध करुन देण्यात आले नाही. ग्रामपंचायतीच्या विविध करातुन जमा झालेली रु.60,380 ही परस्पर खर्च करण्यात आली असुन या रकमेचा कोणताही बँक भरना दाखवण्यात आला नाही. त्या मुळे परस्पर रक्कम खर्च करण्याचा आरोप लावण्यात आला होता. शिवाय ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या नावे मुजरीचे पैसे दिल्याचे व इतर लोकांच्या नावे टाकण्यात आलेल्या रकमेचा तपशिल देखिल मिळत नसल्यामुळे जवळपास रु.86,100 हे गैरहेतुन खर्च करुन अपहार करण्याचा आरोप देखिल त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
बजावली होती कारणे दाखवा
सन 2016- 17 या आर्थिक वर्षात खर्चाचे प्रमाणके, कर कर वसुली व अंदाजपत्रक हे देखिल वारंवार सुचना देऊन देखिल अहवाल सादर केला नाही. ग्रामपंचायतीच्या मासिक ठरावांवर देखिल काही पेज कोरे सोडून सरपंचांच्या सह्या घेतल्या आहेत .त्यामुळे सदरचे इतिवृत्त हे ग्रा.पं.सदस्यांसमोर मांडले गेले नाही तसेच जमा खर्चास सभेचे मान्यता घेतलेली आढळून आली नाही. या सर्व आरोपांबाबत संबधित ग्रामसेवकाला काही दिवसांपुर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र विहीत वेळेत सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यात कसुर करण्याचा व आर्थिक गैर व्यवहार करण्याचे आरोप होत असल्यामुळे गट विकास अधिकारी शिरपूर यांनी सदर निलंबनाची कार्यवाही केली आहे.