मुंबई: राज्यातील १२ हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. मात्र कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणूका घेण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे. ग्रामपंचायत निवडणुका घेता येतील का? याबाबतचा अहवाल २१ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवडणुका होतील का याकडे आता लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाने सुरुवातील गावातीलच एका व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र याला कोर्टात आव्हान देण्यात आल्याने हा निर्णय रद्द करत शासकीय अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीवर नेमणूक करण्यात आली आहे.