ग्रिको रोमनमध्ये भारत दस नंबरी

0

नवी दिल्ली । भारतीय पहिलवानांनी द.आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील ग्रिको रोमन प्रकारात सर्वच्या सर्व 10 सुवर्णपदकांवर कब्जा केला आहे. याशिवाय या प्रकारातील 10 रौप्यपदकेही भारतीय पेहलवानांनी जिंकली आहेत. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय पथकाने 10 सुवर्णपदकांसह अनेक रौप्यपदकेही आपल्या खात्यात जमा केली आहेत. ग्रिको रोमन प्रकारात निर्विवाद वर्चस्व गाजवताना भारताच्या राजेंद्रकुमार (55 किलो), मनीष (60 किलो), विकास (63 किलो), अनिलकुमार (67 किलो), अदित्य कुंडू (72 किलो), गुरप्रीत (77 किलो), हरप्रीत (82 किलो), सुनील (87 किलो), हरदीप (97 किलो) आणि नवीनने 130 किलोगटात सुवर्णपदक जिंकले.

याशिवाय नवीन (55 किलो), द्यानेंद्र (60 किलो), गौरव शर्मा (63 किलो), मनीष (67 किलो), कुलदीप मलिक (72 किलो), मंजीत (77 किलो), अमरनाथ (82 किलो), प्रभाल सिंग (87 किलो), सुमित (97 किलो) आणि सोनू (130 किलो) यांनी देशाला रौप्यपदक मिळवुन दिले. महिला गटाच्या लढतींमध्ये भारतीय महिलांना विजेतेपदासाठी पसंती देण्यात आली आहे. भारताचा दिग्गज पेहलवान सुशीलकुमार फ्रि स्टाईल प्रकारात सहभागी होणार असून त्याची लढत रविवारी होणार आहे.