शिरपूर । महाराष्ट्र शासनाचे वन विभागातर्फे वृक्ष लागवडी संदर्भात ग्रीन आर्मी रथाचे स्वागत करण्यात आले. किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी वृक्ष भेट देऊन रथाचे स्वागत केले.
यावेळी शिरपुर वन विभागाचे वनक्षेत्रपाल भूषण पाटील, वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर शरमाडे, वनक्षेत्रपाल चौधरी,सहाय्यक वनरक्षक समाजेकर,सर्व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमच्या नियोजनासाठी खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हेमंत शेटे , कार्यध्यक्ष जितेंद्र शेटे, सदस्य मयूर बोरसे, हेमंत शिरसाठ, भरत भोई, भरत कोळी, विजेंद्र जाधव आदिनी सहकार्य केले.