ग्रीसच्या बीचवर वॉटर गर्ल बनली कपिल शर्माची हिरोईन

0

नवी दिल्ली: आधी बिग बॉस आणि नंतर कॉमेडियन कपिल शर्माच्या किस किस को प्यार करूं या फिल्ममध्ये चमकलेली अभिनेत्री स्वीडिश-युनानी एक्ट्रेस एली अवराम ग्रीसमध्ये बीचवर सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने बिकिनीवरचे फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याने ती आता वॉटर गर्ल बनली असल्याचे तिच्या चाहत्यांच्या लक्षात आले आहे.

तापसी पन्नूची फिल्म नाम शबानामध्ये एली नुकतीच चमकली होती. ती एकटीच ग्रीसच्या ट्रीपवर गेलीय. तिकडे जाऊनही ती चाहत्यांना विसरलेली नाही. तिने आठवणीने तिचा बिकीनी अवतार सोशल मिडियावर टाकला आणि फॅन्सनाही तो आवडला. काही जणांना फिल्म सागरमधल्या डिंपल कपाडियाच्या या रूपाची आठवण झाली.

समुद्रात चालत असलेल्या एनीने बिकिनीतले फोटो इंस्टाग्रामवर टाकले ते टाकले त्याला पूरक आणखी काव्यही टाकून चाहत्यांना आणखी घायाळ केले आहे. मी या रस्त्यावरून चालतेय… पण माझा रस्ताच विसरत चाललेय… आणि स्वतःलाच भेटू लागलेय… अशी तिची अनुभूतीही खुल्लम खुल्ला तिने मांडलीय.