महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे नामकरण सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील केएसबी चौकातील ग्रेडसेपरेटरचा (समतल विलगक) नामकरण सोहळा महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पार पडला. या ग्रेड सेपरेटरला ‘कै. आमदार अण्णासाहेब पाटील’ यांचे नाव देण्यात आले. चार महिन्यांपासून मागणी करुन तसेच वेळोवेळी पाठपुरावा करून देखील महापालिका पदाधिकार्यांना यासाठी वेळ मिळत नसल्याने संघटनेतर्फे नामकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सोहळ्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सत्यवान उभे, शिवसेना संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, शहरप्रमुख योगेश बाबर, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
ठराव होवूनही प्रशासन ढिम्म
सय्यद म्हणाले, महापालिकेच्या क प्रभाग समितीच्या 4 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये ठराव क्रमांक 10, विषय क्रमांक 4 नुसार नगरसेवक राहुल भोसले व समीर मासुळकर यांनी ग्रेडसेपरेटरला कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांचे नाव देण्याबाबतचा ठराव मांडला होता. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मात्र, मध्यंतरीच्या काळात कुठे माशी शिंकली तेच समजले नाही. ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन होऊनही त्याचे नामकरण अद्याप झाले नाही. यावरून महापालिका माथाडी कामगारांच्या भावनांचा आदर करीत नाही, तसेच सत्ताधारी कष्टकर्यांच्या मागणीला न्याय देत नसल्याची भावना माथाडी कामगारांच्या मनात निर्माण होत आहे.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास भगवान वाल्हेकर, वैभव थोरात, रोमी संधू, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष किसन बावकर, ज्ञानोबा मुजुमले,खंडू गवळी, मुरलीधर कदम, कार्याध्यक्ष परेश मोरे, जन.सेक्रेटरी प्रविण जाधव, सेक्रेटरी भिवाजी वाटेकर, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सल्लागार बाळासाहेब शिंदे, नितीन धोत्रे, शाम सुळके, प्रदीप धामनकर तसेच गोरक्ष दुबाले, राजेंद्र तापकीर, सतीश कंठाळे, हनुमंत शिंदे, अशोक साळुंखे, शंकर मदने, श्रीकांत मोरे, नितीन कदम, मारुती वाळुंज, सुनील सावळे, मारुती कौदरे, विलास ताटे, विजय खंडागळे, चंद्रकांत पिंगट, बाबासाहेब पोते, ओंकार माने, समर्थ नाईकवडे, पांडुरंग काळोखे, बबन काळे, जोगिंदर शर्मा, प्रकाश पवार, गोरक्ष बांगर, ज्ञानेश्वर पाचपुते, ज्ञानेश्वर शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.